Pune News : पुणे शहरातील विविध भागातील दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 2 गुन्हे शाखेकडून करण्यात आली. या चोरट्यांकडून चार गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. या चोरट्यांकडून चोरी केलेल्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत.(Pune News)
दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना अटक.
पोलिसांनी याप्रकरणी अक्षय सुरेश मगर (वय २३ वर्ष रा. साई सत्यम पार्क, कावडे वस्ती, वाघोली), प्रविण आत्माराम बुरकुल (वय १९ वर्ष रा. भाडाळे वस्ती, वाघोली, पुणे), शुभम मोहन चव्हाण (वय २३ वर्ष रा. शिंदे वस्ती लोणीकंद, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर शहरातील चार विविध पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.(Pune News)
दरम्यान, ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस अंमलदार उदय काळभोर, अशोक आटोळे, दिनकर लोखंडे, गणेश लोखंडे, शिवा जाधव, दत्तात्रे खरपुढे, सुदेश सपकाळ, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर, संदीप येळे, अमोल सरतापे, विनायक येवले यांनी केली आहे.(Pune News)