Pune News : कबुतर घेतल्याच्या वादातून सराईत गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने एका १२ वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन मुलाला कबुतराची विष्टा खायला लावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कात्रज परिसरातील संतोषनगर येथील एका अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
साथीदारांच्या मदतीने एका १२ वर्षाच्या मुलाचे अपहरण…
त्यानुसार पोलिसांनी सराईत गुन्हेगार अमोल आडम याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कात्रजमधील संतोषीमाता मंदिराच्या मागील बाजूस मंगळवारी (ता. २६) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.(Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कबुतरे पाळली होती. त्यातील एक कबुतर फिर्यादीच्या १२ वर्षाच्या मुलाने आणले होते. त्यावरुन अमोल आडम हा त्याच्या आणखी तीन साथीदारांसह संतोषनगरमध्ये आला. त्यांनी हवेत हत्यारे फिरवून कोणी जर मध्ये आले तर एका एकाला तोडून टाकीन, असे म्हणून दहशत निर्माण केली.(Pune News)
फिर्यादी यांच्या १२ वर्षाच्या मुलाला हाताने मारहाण केली व शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्याला दुचाकीवर बसवून कात्रज येथील साई अपार्टमेंट येथे नेले. तेथे त्याला कबुतराची विष्टा खायला लावली. त्यानंतर पोलिसांना आमचे घर दाखविले तर तुला जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन त्याला साई मंदिराजवळ सोडून दिले.(Pune News)
दरम्यान, हा प्रकार वडिलांना सांगितला. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक वर्षा तावडे तपास करीत आहेत.