राहुलकुमार अवचट
MLA Rahul Kul : यवत, (पुणे) : दौंड तालुक्यातील ओढ्यावरील चार छोट्या पुलांच्या बांधकामासाठी नाबार्ड अंतर्गत सुमारे ५ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली. MLA Rahul Kul
दौंड तालुक्यातील काही ठिकाणी लहान पुलांची दुरवस्था झाली होती. हे लक्षात घेऊन या पुलांची नव्याने बांधणी करण्यासाठी जुलै २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाबार्ड २८ अंतर्गत सुमारे ५ कोटी ८७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नाबार्ड २८ अंतर्गत मंजूर करण्यात आलेला कामांचा तपशील पुढीलप्रमाणे –
कासुर्डी गावाजवळ कॅनॉलवर लहान पुलाचे बांधकाम करणे – १ कोटी ३५ लाख,
नांदूर गावाजवळ ओढ्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे – १ कोटी ७० लाख,
दहिटणे गावा लगत सटवाईच्या ओढ्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे – १ कोटी १० लाख
मळद गावालगत ओढ्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे – १ कोटी ७२ लाख अशाप्रकारे निधी मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, मंजूर झालेल्या पुलांचे काम सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार असून, लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली. MLA Rahul Kul