दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर, (पुणे ) : शूर क्रांतिकारक, महानायक, शूर योद्धा रेंगा कोरकू यांची जयंती इंदापूरातील जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये २२ जुलै रोजी साजरी करण्यात आली. यावेळी नर्सिंग क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनींचा विशेष सन्मान करण्यात आला. Indapur News
महान क्रांतिकारक रेंगा कोरकू यांचा जन्म हरसूद परिसरातील सोनखेडी गावात झाला. शूर योद्धा रेंगा कोरकू आदिवासींचा मसिहा म्हणून प्रसिद्ध होते. ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांनी तंट्या भील यांच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला. समाजात असे अनेक शूर क्रांतिकारक आहेत ज्यांनी देशासाठी आयुष्य वेचले, त्यापैकी रेंगा कोरकू हे एक आहेत.
यावेळी महाराष्ट्र राज्य परिचर्या परिषदेचे प्रबंधक तुकाराम झगडे, संस्थेचे अध्यक्ष जयंत नायकुडे, संस्थेच्या संचालिका लता नायकुडे, साथी सलीम शेख, इतर मान्यवर व शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होत्या.