Pune Big News : पुणे : अमरावती पोलीस दलातील राजपेठ विभाग सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुणे शहरातीत चतुश्रुंगी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. Pune Big News
भरत शेखा गायकवाड (वय – ५७) असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. तर पत्नी मोनि गायकवाड (वय-४४) आणि पुतण्या दीपक गायकवाड (वय-३५) यांची हत्या झाली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. Pune Big News
मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी कुठलीही सुसाइड नोट सापडली नाहीये. तसेच आज पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कुटुंबात काही वाद झाल्याची प्राथमिक माहिती देखील मिळत आहे.
दरम्यान, हत्या आणि आत्महत्या का केली हे मात्र समजले नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्यातील बाणेर भागात ते राहत होते. त्यांचे कुटुंब येथे रहात होते. ते अमरावती येथे नेमणुकाला होते. तर त्यांची पत्नी, दोन मुले आणि पुतण्या पुण्यात रहात होते.