Pune News ; पुणे : दुचाकीवर आलेल्या तिघांनी पिस्तुलातून बेछूट गोळीबार करत शहरातील एका तंबाखू व्यापाऱ्याला चार लाख रुपयांना लुटले. या घटनेत संबंधित व्यापारी जखमी झाला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेतील फरार गुन्हेगारांचा पोलिसांनी केवळ ‘आई’ या नावामुळे छडा लावला आणि आरोपींना अटक केली.
प्रत्येक गुन्हेगार गुन्हा करताना एखादा तरी पुरावा मागे सोडतोच, असे म्हटले जाते. पोलीस गुन्हेगाराच्या दोन पावले पुढेच असतात. त्यामुळे फरार गुन्हेगार पोलिसांच्या सहज गळाला लागतात. (Pune News) दरम्यान, पुणे शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या लूट प्रकरणात पोलिसांनी गुन्हेगाराचा छडा केवळ ‘आई’ या नावामुळे लावला आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीच्या इतर दोन साथीदारांचा शोध सुरु आहे.
पुणे शहरातील तंबाखू व्यापारी लतेश सुरतवाला हे १९ जुलै रोजी आपल्या दुकानातून घरी जात होते. यावेळी गणेश क्रीडा मंचाजवळ दुचाकीवर आलेल्या तिघांनी पिस्तुलीतून गोळीबार करत लूट केली. (Pune News) या घटनेत त्यांचे चार लाख रुपये गेले आणि ते जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल झाला होता.
कसा आला आरोपी जाळ्यात?
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा घडला त्या परिसरातील गणेश कलाक्रीडा मंचाजवळील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. यावेळी हल्लेखारांनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या दुचाकीवर ‘आई’ हे नाव लिहिलेले दिसले. या धाग्यावरुन पर्वती पोलीस आरोपींपर्यंत पोहचले. त्यांनी सूरज वाघमोडे (वय २१) या आरोपीला अटक केली. (Pune News) त्याच्यासोबत असलेले दोन साथीदार पळून गेले आहेत.
आरोपी सूरज हा मार्केट यार्डमध्ये हमालीचे काम करतो. त्यानेच इतर दोघांना एक गेम करायचा आहे, असे सांगत सोबत घेतले होते. परंतु पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचले. एका धाग्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा तपास केला आहे.
ही कामगिरी निरीक्षक विजय खोमणे, उपनिरीक्षक सुनील जगदाळे, अंमलदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे, प्रकाश मरगजे, नवनाथ भोसले, दयानंद तेलंगे पाटील, प्रशांत शिंदे, किशोर वळे, अनिल तांबोळी यांनी केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आत्महत्येस नकार दिल्याने तरुणीचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न; स्वत:वरही चाकूने वार
Pune News : लवासा हिल स्टेशनची १८१४ कोटींना विक्री; देशातील पहिल्या हिल स्टेशनची कोणी केली खरेदी?