युनूस तांबोळी
Shirur News : आंबळे (ता. शिरूर) गावचे सुपुत्र आयएएस रमेश चव्हाण यांची पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.(Shirur News)
२०१९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत निवड.
यापूर्वी ते राज्याच्या महसूल विभागाचे सहसचिव म्हणून काम पाहत होते. आयुष प्रसाद यांची जळगावच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी शिरुरच्या सुरज मांढरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली होती. महसूल विभागाचे सहसचिव म्हणून काम करीत असताना या विभागातील अनेक कामांचा निपटारा करण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण आंबळे गावीच झाले(Shirur News)
.
त्यानंतर चव्हाण यांनी पुढील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून बी. एस्सी अंशी ही पदवी संपादन केली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेद्वारे ते सन १९९६ मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून महसूल सेवेत दाखल झाले.(Shirur News)
चव्हाण यांनी सातारा लापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि महसूल विभागात सहसचिव आदी पदांवर काम केले आहे. त्यांची सप्टेंबर २०१९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) निवड झाली आहे.
दरम्यान, आयुष प्रसाद यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासकीय कामाकाजात सुधारणा घडवून आणली. शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाईन करण्यामध्ये त्यांचा प्रमुख सहभाग होता.