Loni Kalbhor News : लोणी काळभोर : दरोडा, जबरी चोरी, चैन चोरी यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या व मांजरी (ता. हवेली) येथील ज्येष्ठ महिलेला लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्या अमोल शेलारसह ४ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली हि ३८ वी कारवाई आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ३८ वी कारवाई
टोळी प्रमुख अमोल भास्कर शेलार (वय-२५ रा. नेवासा फाटा, अहमदनगर), स्वप्नील उर्फ भावड्या ईश्वर केंदळे (वय-२९ रा. संभाजीनगर, नेवासा-, अहमदनगर-), अमर चिल्लु कांबळे (वय-३५ रा. मुंकिदनगर, नेवासा), सोने खरेदी करणारा सोनार विजय रामकृष्ण देडगावकर (वय-६२ रा. मुपो कोल्हार, ता. राहता, अहमदनगर) अशी मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Loni Kalbhor News) याप्रकरणी एका ७४ वर्षीय ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला सकाळी मॉर्निग वॉक करुन घराच्या पार्कींगमध्ये आल्या होत्या. तेव्हा तेथे तीन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरुन आले. त्यांनी फिर्यादी यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची मणी माळ जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेली. याप्रकरणी महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. (Loni Kalbhor News) त्यानुसार अज्ञात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा पोलिसांनी तपास केला असता, वरील आरोपींवर दरोडा , जबरी चोरी, चैन चोरी यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपी आंतरजिल्हा गुन्हेगार अमोल भास्कर शेला व त्याच्या टोळीचे सदस्य असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
दरम्यान, पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव तयार करून परिमंडळ ५ पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्याकडे पाठविला. (Loni Kalbhor News) या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
ही कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे , पोलीस निरीक्षक (गुन%ALS����