Indapur News : (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गावच्या हद्दीतील ऊसाच्या शेतात आढळून आलेल्या तरुणाच्या खुनाची उकल करण्यात इंदापूर पोलिसांना यश आले आहे. पैसे व मोबाईलसाठी चौघांनी खून केल्याची कबुली पोलिसांनी दिली असून याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून दोघेजण फरार आहेत.(Indapur News)
अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल.
याप्रकरणी आदित्य सुभाष मोरे (वय-२० रा. गुत्ती, जि. लातूर) व बालाजी वसंत माने (वय- २६, रा. गिताईनगर, ता. उदगिर, जि. लातूर) असे खून करणाऱ्या दोन आरोपींची नावे आहेत. तर
प्रदिप रघूनाथ पवार (वय-२६ रा. रामतिर्थ तांडा, जळकोट, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाकडून ७ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.(Indapur News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. १२) पहाटे सरडेवाडी शिवारातील गलांडवाडी रोडवरील उसाच्या शेतात एका अनोळखी व्यक्तीचा गळा आवळून तसेच डोक्यात दगड मारून अत्यंत क्रूरपणे खून करून फेकलेला मृतदेह मिळून आला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस पथकाने घटनास्थळी जावून मृतदेह तसेच आजूबाजूच्या परिसराची सखोल पाहणी केली होती अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.(Indapur News)
सदर खुनाचा पोलीस तपास करीत असताना मृतदेहाची ओळख करीत असताना प्रदीप पवार रात्री साडेअकराच्या वाजताच्या सुमारास बालेवाडी, पुणे येथील नातेवाईकांना भेटून सोलापूर येथील बहिणीकडे निघाल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली होती. मयत व्यक्तीचा खून हा आर्थिक व्यवहार, पुर्ववैमनश्य, अनैतिक संबंध यातून झालेला वाटत होते. परंतू तपासामध्ये तसे काहीही दिसून येत नव्हते तसेच मयत इसम हा कोणत्या वाहनाने सोलापूर येथे निघाला होता याबाबत काहीही माहिती नव्हती.(Indapur News)
तपास पथकाने सलग ६ दिवस रात्र तपास करून पुणे, हडपसर, कुरकुंभ, पाटस, कुंजीरवाडी, टेंभुर्णी, कुर्डवाडी, सोलापूर येथील सीसीटिव्हीचे फुटेज तपासले. परंतू रात्रीची वेळ असल्याने वाहनाच्या लाईट सुरू असल्यामुळे तसेच मयत व्यक्ती हा कोणत्या वाहनाने सोलापूर येथे निघाला होता. याबाबत माहिती नसल्याने तपासात अनेळ अडथळे येत होते.(Indapur News)
मंगळवारी (ता. ११) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुणे येथून लातूर येथे निघाले असताना मयत इसम हा हडपसर गाडीतळ येथून सोलापूर येथे जाण्यासाठी थांबला होता. त्यास सोलापूर येथे सोडतो असे बोलून त्यास गाडीमध्ये बसवून प्रवास सुरू असताना मयत व्यक्तीकडील त्याच्याकडील पैसे व मोबाईल घेण्यासाठी त्यास मारहाण करून गाडीतीलच रस्सीने गळा तसेच संपुर्ण शरिराला बांधुन त्यास गाडीतून उचलून सरडेवाडी शिवारातील गलांडवाडी रोडवरील उसाच्या शेतात डोक्यात मोठा दगड मारून त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.(Indapur News)
दरम्यान, याप्रकरणाचे कसले ही धागेदोरे नसताना तपास करणे पोलिस यंत्रणेसमोर आव्हान होते. सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी तपास पथकास मार्गदर्शन केले.