Pachagni News : (सातारा) भोसे (ता. महाबळेश्वर) येथे एका बंगल्यात काम करीत असलेल्या कामगाराने घरातील पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. हि घटना बुधवारी (ता. १९) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.(Pachagni News)
गळफास घेऊन आत्महत्या.
हेमंत शेरसिंह बोहरा (रा. रमदा विलेज, भोसे ता. महाबळेश्वर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी समीर भूपेंद्रसिंह अधिकारी (मु. रा. उत्तराखंड सध्या रा. भोसे ता. महाबळेश्वर जि. सातारा) यांनी पांचगणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pachagni News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसे येथील ग्रामपंचायत हद्दीत हेमंत बोहरा व समीर अधिकारी हे एका बंगल्यात काम करीत होते. यामुळे ते एकत्र राहत होते. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हेमंत बोहरा याने राहत असलेल्या खोलीत पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेला दिसून आला. सदर घटनेची माहिती तात्काळ पांचगणी पोलीस ठाण्यात देण्यात आली.(Pachagni News)
दरम्यान, या घटनेची पांचगणी पोलीस ठाण्यात याची अकस्मात मयत म्हणून नोंद झाली असून
या घटनेचा अधिक तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश माने यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हवालदार वैशाली चव्हाण व त्यांचे सहकारी करीत आहेत.