Mumbai News : मुंबई : किरीट सोमय्या यांनी कथित व्हायरल व्हिडीओप्रकरणी माझी चौकशी करा, असं पत्र देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. किरीट सोमय्या सातत्याने ईडी, सीबीआय चौकशीची मागणी करत होते. याच किरीट सोमय्यांच्या मागणीप्रमाणे तुम्ही त्यांची चौकशी ईडी, सीबीआयकडे देणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विचारला आहे.
व्हिडिओवरुन विरोधक आक्रमक
भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. किरीट सोमय्या या व्हिडिओमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. (Mumbai News) महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक या व्हिडिओवरुन आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सुद्धा किरीट सोमय्या यांच्या विषयावरुन देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे. त्यांनी भाजपवर जळजळीत टीका सुद्धा केली आहे.
देशात कोणी काय खावं, कोणी कुठले कपडे घालावेत, हे देखील भाजपकडून ठरवले जाते. त्यांच्या मताशी विसंगत मते मांडणाऱ्याला देशद्रोही ठरवले जाते. (Mumbai News) हे सगळे मापदंड भाजपने स्वतःच घालून दिले आहेत. तसेच मापदंड भाजपने किरीट सोमय्यांना देखील घालून दिले आहेत का? असा प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारला आहे.
मोठ्या नेत्यानी केलेली कृत्ये माफ केली जातात. जसे धनंजय मुंडेप्रकरणी करुणा शर्मा, पूजा चव्हाण यांच्यावर अन्याय झाला. संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. राहुल शेवाळे यांनी अन्याय केलेल्या महिलेला देखील न्याय मिळाला नाही. आता सोमय्यांनी अन्याय केलेल्यांना भाजप तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून न्याय मिळेल असे मला वाटत नाही. फडणवीस सोमय्याला क्लीन चीट देणार का? असा सवाल देखील भास्कर जाधव यांनी विचारला आहे. (Mumbai News) लोकांना ब्रम्हज्ञान सांगायचं, नैतिकतेचे धडे द्यायचे; मात्र, स्वतः कृतीत आणायचे नाही, ही भाजपची निती असल्याचा घणाघात जाधव यांनी केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : माझ्याकडे सोमय्यांचे अनेक व्हिडीओ; पेन ड्राइव्ह घेऊनच सभागृहात जातोय; दानवेंचा इशारा!