Pune News : कौटुंबिक वादातून मेव्हण्याने दाजीचे एका बुक्कीत चार दात पाडल्याची धक्कादायक घटना पुण्यातल्या मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. रविवारी (ता. १६) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.(Pune News)
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सयाजी साहेबराव बोरसे (वय-४६) असे दात पडलेल्या दाजीचे नाव आहे तर जितेंद्र देवदास पाटील (वय-४५) असे मारहाण केलेल्या मेव्हण्याचे नाव आहे. याबाबत सयाजी बोरसे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मेव्हणा जितेंद्र पाटील याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.(Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सयाजी साहेबराव बोरसे यांचे बऱ्याच दिवसांपासून त्याच्या मेव्हण्यासोबत कौटुंबिक वाद सुरू होते. त्याचा राग मनात धरून फिर्यादी सयाजी बोरसे यांनी आरोपी जितेंद्र पाटील यांना फोन करून तुझ्यामुळे माझं खूप नुकसान झालं आहे, असे बोलून वाईट वाईट शिविगाळ केली.(Pune News)
त्यानंतर आरोपी जितेंद्र पाटील त्याच्या पत्नी आणि मुलासह फिर्यादीच्या घरी याचा जाब विचारण्यासाठी गेला. आरोपी जितेंद्र पाटील यांनी फिर्यादी सयाजी बोरसे यांच्या मुलाला शिवीगाळ केली.(Pune News)
दरम्यान,जितेंद्रने सयाजी यांच्या तोंडावर हाताने बुक्की मारली. यामध्ये सयाजी बोरसे यांचे चार दात तुटले. या बाबत सयाजी यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहे.(Pune News)