Job News : नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या ईशान्य रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती अंतर्गत 1104 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उत्तर पूर्व रेल्वे ner.indianrailways.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. ईशान्य रेल्वेच्या या भरतीसाठी 2 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करता येतील. Job News
एकूण पदे किती? 1104 पदांवर थेट भरती
पात्रता काय?
या रेल्वे भरतीसाठी पात्रता निकष, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया
किमान अत्यावश्यक पात्रतेनुसार, विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमधील आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा काय?
अर्ज करण्यासाठी किमान आवश्यक वय 15 वर्षे आहे आणि वयोमर्यादा 24 वर्षे असणार आहे.
गुणवत्ता यादी तयार होणार…
मॅट्रिक आणि आयटीआय या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये उमेदवारांनी मिळवलेल्या टक्केवारीतील गुणांची सरासरी घेऊन गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
निवडलेल्या उमेदवारांना एक वर्षाचे प्रशिक्षण..
ईशान्य रेल्वे प्रशिक्षणार्थी भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या कालावधीसाठी शिकाऊ प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि त्यांना सरकारच्या नियमांनुसार स्टायपेंड दिला जाईल.
अधिक माहितीसाठी…
पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील पाहण्यासाठी उमेदवारांनी ईशान्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट ner.indianrailways.gov.in वर किंवा apprenticeshipindia.gov.in वर अप्रेंटिसशिप इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करु शकता.