महेश सूर्यवंशी
Daund News : देऊळगाव राजे (पुणे) : येथील सुषमा रामभाऊ लावर यांची रेविन्यू असिस्टंट महसूल सहाय्यक मंत्रालय पदी नुकतीच निवड झाली आहे. सातत्य पूर्ण आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर तिने नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएसीच्या परीक्षेत हे यश मिळविले आहे.(Daund News)
एमपीएसीच्या परीक्षेत हे यश मिळविले आहे.
सुषमाचे प्राथमिक शिक्षण देऊळगाव राजे येथिल जिल्हा परिषदेचे शाळेत झाले असून, माध्यमिक शिक्षण सिध्देश्वर माध्यमिक विद्यालय देऊळगाव राजे येथे झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षण बारामती येथिल शारदानगर येथे झाले आहे तसेच बीए पदवी व एम ए पदवी प्राप्त केली असून काही दिवस तेथील कृषी विज्ञान केंद्राच्या शेती विषयक माहिती देणाऱ्या वाहिनीवर काम केले होते.(Daund News)
बारामती एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सचिव सुनंदा पवार यांच्या प्रत्येक कामात मदत करून शाळेचे काम, पुणे येथे भरणारी भीमथडी यात्रा यामध्ये भाग घेऊन एक विश्वासू सहकारी म्हणून काम केले आहे. पण जीवनात काही तरी मोठं करुन दाखण्याच आणि आई वडिलांचं नाव मोठं करण्याचं स्वप्न तिला गप्प बसून देत नव्हत, पुढे जाऊन तब्बल सहा सात वर्ष अथक प्रयत्न करुन तिने हे यश संपादित केले आहे.(Daund News)
दरम्यान, सुषमाचे वडील रामभाऊ लावर हे शेतकरी असून तिची आई गृहिणी आहे, या यशाबद्दल तिचे देऊळगाव राजे आणि परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे, राज्य लोकसेवा आयोगाच्या आणखी तीन परीक्षांचा निकाल प्रलंबित असून यापेक्षाही अजुन चांगली पोस्ट मिळेल असा विश्वास सुषमा ने व्यक्त केला आहे.(Daund News)