Poetry : ‘आता माझ्या ओजंळीने प्या’ (युनूस तांबोळी-शिरूर) Poetry
कोण म्हणतो गेली गुलामी
जनतेची ही फसवणूक रे…
‘आता माझ्या ओझंळीने प्या’
हिच मानवा तुझी संस्कृती रे… ! 1 !…
हडपूनी गडगंज संपत्ती सारी
झगडा एकमेका लावीती रे
मंत्री म्हणवती सत्तेसाठी
विरोधी गळाभेट करीती रे
तुच नाचवितो डोक्यावरती
सत्तेसाठी त्यांना रे …!2!…
निष्ठेसाठी लढती सारी
उघडी जरी पडती रे
स्वतः कार्यकर्ता म्हणवूनी घेती
धुपाटणे त्यांच्या हाती रे
तूच सांग आता मानवा
तुझ्या हाती काय देती रे….!3 !…
विश्वास ठेवला जरी तू
चिंता कशाची यांना रे…
बढाया त्यांच्या कष्ट आमुचे
करीती वल्गना कोटी च्या रे
तुच विकलास तुझा अधिकार
कर्तव्य बजावण्यास चुकला रे…!4!…