Pune News : पुणे : आय टी कंपनीत काम करणाऱ्या महिलेवर एकतर्फी प्रेमातून एका २६ वर्षीय तरुणाने लाकडी दांडग्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट येथे बुधवारी (ता. १२) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. Pune News
संकेत शहाजी म्हस्के (वय २६, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत येरवडा येथील ३७ वर्षाच्या महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Pune News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या खराडी येथील आय टी कंपनीत नोकरी करतात. त्यांचा घटस्फोट झाला आहे. काही महिन्यांपूर्वी संकेत म्हस्के याच्याशी त्यांची भेट होऊन ओळख झाली होती. त्याच्याबरोबर आणखी एकाबरोबर त्यांची मैत्री झाली होती. दरम्यान, त्यांचा घटस्फोट झालेला पती पुन्हा त्यांच्या संपर्कात आला होता.
संकेत म्हस्के याने एक महिन्यांपूर्वी माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडते, असे म्हणून फिर्यादीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी आपला पती पुन्हा संपर्कात असून मी तुझी फक्त मैत्रीण राहु शकते, असे सांगितले होते. त्याचा नंबरही ब्लॉक केला होता. काही दिवसांनी त्यांनी त्याला पुन्हा अनब्लॉक केले. फिर्यादी या बुधवारी सकाळी सात वाजता बर्निग घाट येथे एका मित्राकडे आल्या होत्या. त्यावेळी संकेत रिक्षातून आला. त्याने पाठीमागून येऊन फिर्यादीला पकडले. Pune News
तू मला भेटत का नाही. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला खूप आवडते, तू माझी होऊ शकत नाही तर कोणाचीही होऊ देणार नाही, असे म्हणून शिवीगाळ करत त्याने लाकडी दांड्याने फिर्यादीच्या हातावर जोरात मारले. त्या खाली पडल्यावर त्यांच्या डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे पाहून संकेत म्हस्के पळून गेला.
दरम्यान, फिर्यादी यांच्यावर खासगी रुग्णालयातील अति दक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक वराळे अधिक तपास करीत आहेत.