Pachgani News पाचगणी : हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या पाचगणी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी धनंजय चना प्रोडक्टचे संचालक स्वप्निल परदेशी यांची निवड करण्यात आली आहे. (Pachgani News) तर सचिवपदी नितीन कासुर्डे व खजिनदारपदी शेखर भिलारे यांची निवड करण्यात आली. (Pachgani News)
पाचगणी येथील किमिन्स हायस्कूलच्या सभागृहात नुकतीच हि निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी अध्यक्षपदी स्वप्निल परदेशी, सचिवपदी नितीन कासुर्डे व खजिनदारपदी शेखर भिलारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनमाडच्या दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष येजूरवेंद्र महाजन, रोटरी विभाग ३१३२ च्या प्रांतपाल स्वाती हेरकळ, सहाय्यक प्रांतपाल मदन पोरे, माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी येजूरवेंद्र महाजन म्हणाले, रोटरी सारखे प्लॅट फाॅर्म आपल्याला चांगला माणूस बनवतो. आपण कोठे जन्माला आलो हे आपल्या हातात नसतं परंतु कर्तृत्व आपल्या हातात असते. रोटरी क्लब ही जागतिक संस्था आपल्या सामाजिक उपक्रमातून राष्ट्रापती असलेली बांधिलकी जपते.
स्वाती हेरकळ म्हणाल्या, रोटरी क्लबच्या माध्यमातून २३-२४ हे वर्ष परिवर्तन वर्ष साजरे करणार असून १००० शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम राबवणार आहोत. त्याचबरोबर १०० खेडी दत्तक घेणार आहोत.
दरम्यान, या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाला मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून करण्यात आली. त्यानंतर मावळते अध्यक्ष भूषण बोधे यांनी वर्षेभरात केलेल्या सामाजिक कामांचा रिपोर्ट चित्रफीतीद्वारे सादर केला. यावेळी डॉ.अरुना रसाळ, अमृता पोरे,अमय भिलारे, आदित्य सामंत, नचिकेत बोधे, प्रविण गोळे, प्रमोद कासुर्डे,अनुज शहा, योगेश मालुसरे,शाम चौरसिया,अमित शहा यांनी रोटरीचे सदस्यत्व स्वीकारले.
या वेळी का पाचगणी, महाबळेश्वर, वाई व कराड या रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नितीन भिलारे व जयवंत भिलारे यांनी तर आभारप्रदर्शन आय लव्ह पाचगणी फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र भगत यांनी केले.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष स्वप्निल परदेशी म्हणाले कि, या पदाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविणार आहे. तसेच समाजपयोगी कामे करण्यासाठी भर देणार आहे. असे परदेशी यांनी बोलताना यावेळी सांगितले.