दीपक खिलारे
MPSC News : इंदापूर : युपीएससी, एमपीएससी व बँकिंग क्षेत्रातील परीक्षेमध्ये यश संपादन करणाऱ्या इंदापूर तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याहस्ते रविवारी (ता.९) करण्यात आला आहे.(MPSC News)
मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले कि, इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून आपले आई-वडील, मार्गदर्शक शिक्षक व तालुक्याचा डंका महाराष्ट्रात गाजविला आहे. तसेच इंदापूर तालुक्याचा स्पर्धा परीक्षेतील यशस्वी होण्याचा गुणात्मक असा पॅटर्न तयार केला आहे.(MPSC News)
यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेला तुषार शिंदे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत पास झालेले करिष्मा महादेव वणवे, अभिजीत दत्तात्रय ढेरे, रणधीर काशिनाथ रोकडे, ज्योती नारायण शिंदे, जयसिंग बाळासाहेब भाळे, विजय सुरेश महाडिक व आरबीआयमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या शिवानी भाऊसाहेब वाकळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.(MPSC News)
दरम्यान, यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंदापूर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी केले.(MPSC News)