लोणी काळभोर : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हयातून २ वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी थेऊरफाटा (ता. हवेली) परिसरातून अटक केली आहे.
प्रणव भारत शिरसाठ (वय-२१ रा. आंग्रेवस्ती, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितनुसार, पुणे शहर, जिल्ह्यातून २ वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेला आरोपी प्रणव शिरसाठ हा थेऊर फाट्यावर हातात कोयता घेउन दहशत निर्माण करत असलेबाबतची बातमी पोलीस अमलदार शैलेश कुदळे यांना मिळाली होती. सदर माहिती वरिष्ठांना सांगून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार आरोपीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस पथकाने तडीपार सराईत गुन्हेगारास थेउर फाटा परिसरातुन पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपी प्रणव शिरसाठ याच्यावर विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून तो एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आरोपीला २५/०८/२०२१ रोजी पासून २ वर्षा करीता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हयातून तडीपार केले होते. शिरसाठ याला अटक केल्यानंतर त्याच्या विरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम १४२. भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) तसेच लॉ अलायमेंट अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, हवालदार शैलेश कुदळे, पुंडे यांच्या पथकाने केली आहे.