Mumbai News : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. याबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर १४ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुनावणी लवकर व्हावी, यासाठी ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणीदरम्यान काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
‘या’ दिवशी होणार सुनावणी!
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिंदे गटातील सोळा आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता. शिवसेनेच्या ४० तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही नोटीस बजावली आहे. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या आमदारांना अपात्र करण्याबाबत योग्य तो निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र या निर्णयासाठीची वेळ ठरवून देण्यात आलेली नाही.
या याचिकेवर लवकर निर्णय घेण्याची मागणी सुनील प्रभु यांनी केली होती. यासह विधानसभा अध्यक्षांना निलंबनाबाबत निर्देश द्या, अशीही मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे. (Mumbai News) आमदार सुनील प्रभू यांनी मुख्य व्हिप म्हणून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे आणि इतर १५ बंडखोर आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल केली होती. त्यानंतर सुनील प्रभू यांनी ठाकरे गटाच्या वतीने या महिन्यात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजीच्या निकालात विधानसभा अध्यक्षांना याचिकांवर मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले असतानाही राहुल नार्वेकर हे जाणूनबुजून सुनावणीला उशीर करत असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. (Mumbai News) एकनाथ शिंदे आणि त्यांचे १६ आमदार हे अपात्र ठरणार असल्याने भाजपने आधीपासूनच सरकारवर पायउतार न होण्यासाठी अजित पवारांनी यांना सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
ठाकरे गटाचे आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस पाठवली आहे. या नोटीसीचे उत्तर त्यांना येत्या सात दिवसांत द्यावे लागणार आहे. तर न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकर यांना सुद्धा ११ ऑगस्टच्या आधी १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय होणार असून, याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे.
आमदारांना पाठवलेल्या नोटीसीवर कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस कशी बजावली याची कायदेशीररित्या तपासावी लागेल. सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांची निवड आणि प्रतोद यांची निवड बेकायदेशीर आहे, (Mumbai News) असं म्हटलं होतं. विधानसभा अध्यक्षांनी मागेच अपात्रतेचा निर्णय घ्यायला हवा होता. जर अपात्र ठरवणार असतील तर त्या आधीच दुसरा मुख्यमंत्री राज्यात नेमला जाऊ शकतो. अजित पवार किंवा भाजपा ठरवेल तो… मात्र अध्यक्षांना लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल , असं असिम सरोदे यांनी म्हटलं आहे.