Priya Bapat मुंबई : मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रिया बापट ही आघाडीची अभिनेत्री आहे. गेली अनेक वर्षे ती मालिका, नाटक, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आतापर्यंत तिने अनेक चित्रपट केले. पण छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळवूनही ती मालिकांमध्ये फार काम करताना दिसली नाही. आता तिने यामागचं कारण सांगितलं आहे.( Priya Bapat )
आपण फक्त चित्रपटच करायचे हा माझा निर्णय पक्का होता.
प्रियाने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. ‘दे धमाल’ या मालिकेत ती झळकली. तर त्यानंतर तिने ‘अधुरी एक कहाणी’, ‘शुभंकरोती’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. तिने साकारलेल्या या भूमिकांचं खूप कौतुक झालं. पण ती मोठ्या पडद्यावर अधिक रमली. तिने ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ ‘टाईमपास २’, ‘टाईमपास ३’, ‘वजनदार’ अशा विविध चित्रपटांमधून काम केलं. ती मुद्दामच मालिकांपासून लांब राहिली. आता याचं नेमकं कारण काय याचा खुलासा तिने केला आहे.(Priya Bapat )
एका मुलाखतीत प्रिया म्हणाली की, ‘मी ‘आभाळमाया’ आणि ‘अधुरी एक कहाणी’ या मालिका केल्या. तेव्हा मी शिकत होते. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात काम केल्यानंतर मी अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. 2010 साली मी ‘शुभंकरोती’ मालिकेत काम केलं. पण मी मालिका या माध्यमामध्ये रमू शकले नाही. ही मालिका संपल्यानंतर मी ‘नवा गडी नवं राज्य’ हे नाटक, ट्रॅव्हल शो, ‘काकस्पर्श’, ‘टाईमप्लीज’ अशा वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये काम केलं.( Priya Bapat )
त्यानंतर आपण फक्त चित्रपटच करायचे हा माझा निर्णय पक्का होता. कारण मी रोज सकाळी उठून सेटवर जाऊन एकच भूमिका नाही साकारू शकत. तो माझा स्वभावच नाही आणि म्हणून मी मालिकांपासून लांब राहिले.( Priya Bapat )