Pune News : पुणे : दुचाकीला पुढे जाण्यास वाट न दिल्याने तिघांनी एका रशियन दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याची घटना कोरेगाव पार्क भागात घडली आहे. या प्रकरणी दुचाकीवरील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका रशियन नागरिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मूळचे रशियाचे आहेत. ते नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्यास असून, एका खासगी कंपनीत सल्लागार आहेत. पादचारी रशियन नागरिक कोरेगाव पार्क भागातून जात होता. त्या वेळी दुचाकीस जागा न मिळाल्याने दुचाकीवरील तिघांनी रशियन नागरिकाशी वाद घातला. तरुणांनी रशियन नागरिकाला मारहाण केली.
दरम्यान, रशियन नागरिकाच्या पत्नीने मध्यस्थी करणाचा प्रयत्न केला, तेव्हा तिघांनी रशियन महिलेला धक्काबुक्की केली. आरोपी दुचाकीवरून पसार झाले. कोरेगाव पार्क परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणाच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
येरवड्यातील कल्याणीनगर भागात पादचाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून लुटले..
येरवड्यातील कल्याणीनगर भागात पादचाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून लुटलेयाबाबत राजेश लक्ष्मीनारायण तावरे (वय ५४, रा. कल्याणीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तावरे मुंबईला निघाले होते. (Pune News)
येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकातून त्यांना चोरट्यांनी अडवले. पत्ता विचारण्याचा बहाणा करून चोरट्यांनी तावरे यांना शस्त्राचा धाक दाखवला. त्यांच्याकडील मोबाइल हिसकावून चोरटे दुचाकीवरून पसार झाले. पोलिस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे तपास करीत आहेत. (Pune News)