Pune News : पुणे : बाथरुममध्ये गेलेल्या मुलाचा त्याच्या मित्राने बाथरुमचा दरवाजा बाहेरुन लावला त्यामुळे कोंडल्याने मुलाने सुटकेसाठी बाथरुमचा दरवाजा जोरजोरात वाजविला. या प्रकाराने चिडलेल्या क्लास शिक्षिकाने १२ वर्षाच्या मुलाला धमकावून स्टिलच्या रॉडने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. Pune News
याप्रकरणी चिंचवड गाव येथील एका वडिलांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार उजवी भुसारी कॉलनी येथील एका क्लास शिक्षिकेवर पोलिसांनी बाल न्याय कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. Pune News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उजवी भुसारी कॉलनीत एक क्लास आहे. फिर्यादी यांचा १२ वर्षाचा मुलगा या क्लासला येतो. २ जुलै रोजी़ दुपारी अडीच वाजता हा मुलगा बाथरुममध्ये गेला होता. त्यावेळी त्यांच्या मित्राने बाथरुमचा दरवाजा बाहेरुन लावला. त्यामुळे तो आत कोंडला गेल्याने त्याने दरवाजा जोरजोरात वाजविला.
दरम्यान, त्यावेळी क्लास घेणार्या शिक्षिका यांनी ‘‘तुला संस्कार नाहीत का शिकविले. तुला अक्कल नाही का, तुला नागडा करुन झोपडपट्टीत फिरवेन, तुला पोलिसात देईऩ’’ अशी धमकी देऊन त्याच्या हातावर स्टिलच्या रॉडने जोरजोरात फटके मारुन दुखापत केली. पोलिसांनी ज्युवेनाईल जस्टिस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पांढरे तपास करीत आहे.