Kedgaon News केडगाव :वरवंड (ता. दौंड) येथील एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयात “व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन शुक्रवारी (ता.७) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास करण्यात आले आहे. हे आयोजन Kedgaon News
अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका दौंड व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
मराठा समाजातील युवक व युवतींना उद्योजक बनविणे – तसेच जे उद्योजक आहेत त्यांना आपल्या व्यवसायात वाढ करण्याच्या उद्देशाने या आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे हे देखील उपस्थीत राहणार आहेत. या शिबिराच्या कार्यक्राअंतर्गत उपस्थितांना उद्योजकता व व्यवसाय, त्यांचा विकास, तसेच त्यासाठी चे आर्थिक सहाय्य अशा विवीध विषयावर मार्गदर्शन केले जाणारे आहे.(Kedgaon News)
यासाठी प्रामुख्याने पुणे येथील मिटकॉनचे संचालक गणेश खामगळ, कर सल्लागार डी. एस. बोरकर,
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे समन्वयक संकेत लोहार व विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थीत राहणार आहेत.
तरी इच्छुक मराठा बंधू-भगिनींनी सहभागी व्हावे, व उद्योजक व व्यावसायिक अशा शेत्रात यशस्वी होण्याच्या संधीच सोन करावं.
दरम्यान, दौंड तालुक्यातील तरुण वर्गाने या व्यवसायिक शेत्रात प्रावीण्य मिळवून स्वतः एक उत्कृष्ट असा व्यवसायिक व्हावे या हेतूने अखिल भारतीय मराठा महासंघ, तालुका दौंड याच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.(Kedgaon News)
हा कार्यक्रम शुक्रवारी (ता.७)
मराठा समाजातील युवक व युवतींना उद्योजक बनविणे व जे उद्योजक किंवा व्यवसायिक आहेत त्यांचा व्यवसाय वाढीस जावा त्यांना येणाऱ्या आर्थिक किंवा इतर कुठल्याही अडचणी आमच्या पर्यंत पोहचल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचे निरासरण होईल यासाठी अशा शिबिराचे आयोजन केले आहे.(Kedgaon News)
संजय थोरात (उपाध्यक्ष-दौंड तालुका अखिल भारतीय मराठा महासंघ)