Mumbai News : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार रविवारी सहभागी झाले. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर त्यांच्यासोबत आलेल्या इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण या सर्व घडामोडींवर ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे.
रातोरात हा निर्णय झाला नाही, सर्वांनी पक्ष म्हणून ठरवलं
अजित पवार यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून कारवाई केली जात आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील बंडखोरीनंतर अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलंय. (Mumbai News ) अशातच आता अजित पवार यांच्या बाजूने उभे राहिलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
प्रफुल्ल पटेल यांना भाजपसोबत जाण्याचा निर्णय कधी झाला? असा सवाल विचारला गेला. त्यावर त्यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये चर्चा होत होती. (Mumbai News ) अनेकांची इच्छा होती की भाजपसोबत जावं. आम्ही वेगळी काही भूमिका घेतली नाही. रातोरात हा निर्णय झाला नाही. सर्वांनी पक्ष म्हणून ठरवलं, आमदार आणि पदाधिकारी सर्वजण होते. भाजपमध्ये जाण्याची वर्षभरापासून चर्चा होती.
शरद पवार माझे गुरू
शरद पवार माझे गुरू आहेत. मला शरद पवारांवर भाष्य करायचं नाही. शरद पवार आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. शरद पवार हे माझ्यावर नाराज होणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : खूशखबर! जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ… कोणाला दिलासा?