Pune Attack : पुणे : पुण्यातील सदाशिव पेठ येथे एका तरूणीवर काल (ता.२८ जून) भरदिवसा कोयत्याने हल्ला झाल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली होती. या घटनेवरुन राजकीय क्षेत्रात आता आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगले आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आता या वादात उडी घेत उपमुख्यमंत्री न गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनीही एक ट्विट करत निषेध व्यक्त केला आहे. (Pune Attack ) आणि “गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा” अस म्हणतं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
विद्येच माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात लागोपाठ दोन घटना घडल्याने मुलींच्या सुरक्षितेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. MPSC टॉपर दर्शना पवारची हत्या राहुल हांडोरेने धारदार कटरने केली. (Pune Attack ) त्याच्या काहीच दिवसांनीच पुण्यातच मंगळवारी (दि.२७) एका तरुणाने भरदिवसा कोयत्याने एका तरुणीवर हल्ला केला. यानंतर विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत.
गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय
अजित पवार यांनी ट्विट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटल आहे की, “विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. (Pune Attack ) गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो.”
त्याचबरोबर त्यांनी संबंधित घटनेतील तरुणीला वाचवणाऱ्या तरुणांचही त्यांनी ट्विट करत कौतुक केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, ” पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लवलेश जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी मोठ्या शिताफीनं धैर्य दाखवून एका तरुणीचा जीवघेण्या हल्ल्यातून जीव वाचवला, माणुसकी जिवंत असल्याचा वस्तुपाठ जगाला दाखवून दिला. (Pune Attack ) अशा काही तरुणांमुळे पुण्यात सौहार्दयाचं वातावरण आणि पुण्याची संस्कृती टिकून आहे. या दोन्ही तरुणांचं मी कौतुक आणि अभिनंदन करतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : जगातील सातही आश्चर्ये आता पहा पुण्यात, तेही एकाच ठिकाणी… आहे ना आश्चर्य?
Pune News : पावसाळा आणि सापांचा प्रजनन काळ यामुळे काळजी घेणे गरजेचे