Lonavala News : पुणे: पावसाचे आगमन होताच पर्यटकांना गड किल्ले खुणावू लागले आहेत. पावसाळ्यात अनेकजण जंगल सफारीचा आनंद लुटतात. मात्र पर्यटनाचा आनंद घेण्यापूर्वी संबंधित ठिकाणाची माहितीही घेतली जात नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची अथवा फजिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच एक थरारक घटना लोणावळा परिसरात थरारक घटना घडली आहे.
शिवदुर्ग मित्र आणि मावळ वन्य जीवनरक्षक टीमचे सदस्य धावले मदतीला…
पुण्यातील नामांकित इंजीनियरिंग कॉलेजचे विद्यार्थी लोणावळ्याच्या राजमाची किल्ला परिसरातील ढाक बहिरी डोंगरावर मंगळवारी ट्रेकिंगसाठी गेले होते. दाट धुके आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चार जण दिशा भरकटले. त्यावेळी शिवदुर्ग मित्र आणि मावळ वन्य जीवनरक्षक टीम त्यांच्या मदतीला धावले. (Lonavala News) अंधार आणि धुकं या सह पावसामुळे शोध मोहिमेत अनेक अडथळे आले. मात्र रात्री उशिरा तब्बल साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर चारही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना शोधण्यात टीमला यश आले.
चेतन कबाडे, अमोल मोरे, सुमित शेंडे आणि आदित्य सांगळे अशी चारही मित्रांची नावे आहेत. पुणे शहरातील नामांकित कॉलेजचे चार विद्यार्थी लोणावळ्यातील ढाक बहिरी येथे डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. मावळ आणि लोणावळा परिसरात पाऊस कोसळत आहे. दाट धुके आणि सतत कोसळत असलेल्या पावसामुळे चार तरुण घनदाट जंगलात दिशा भरकटले. सायंकाळी दिशा भरकटलेले तरुण रात्री उशिरापर्यंत मदतीच्या अपेक्षेने एकाच ठिकाणी थांबून होते. अखेर, लोणावळा शिवदुर्ग मित्र आणि मावळ वन्य जीव रक्षक, कामशेत पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. (Lonavala News) त्यांच्याशी संपर्क केला. रात्री दहा साडेदहा वाजता शोधमोहीम सुरू झाली. सतत कोसळत असलेला पाऊस, घनदाट झाडी आणि अंधार यामुळे शोधकार्यात अनेक अडथळे येत होते. तरुणांच्या मोबाईल ला नेटवर्क असल्याने त्यांच्याशी अधूनमधून संपर्क व्हायचा. घनदाट जंगल, अंधार, हिंस्त्र प्राण्यांच्या आवाजामुळे तरुण भयभीत झाले होते.
अखेर तीन ते साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना शोधण्यात शिवदुर्ग मित्र, मावळ वन्य जीवरक्षकच्या टीमला यश आले. रात्री दीडच्या सुमारास त्यांचा शोध यशस्वीपणे घेतला. (Lonavala News) तरुण अत्यंत भीतीच्या सावटाखाली होते. पावसाळा सुरू असल्याने लोणावळ्यात दररोज शेकडो पर्यटक येतात. तसेच, ट्रॅकिंगसाठी धाडस करतात. परिसराची माहिती असेल तरच असे धाडस करावे असे आवाहन शिवदुर्ग चे सुनील गायकवाड यांनी तरुणांना आणि पर्यटकांना केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Lonavala News : ‘चारधाम’ यात्रेचे आमिष दाखवत 37 जणांची केली फसवणूक ; दहा लाखांना घातला गंडा