संदीप टूले :
MLA Rahul Kul : दौंड, (पुणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 9 वर्षांच्या काळात अनेक लोककल्याणकारी योजना, महत्वपूर्ण विकासकामे झाली. कलम 370, सर्जिकल स्ट्राईक यांसारखे निर्णय झाले. तसेच कोरोना काळात 100 कोटींपेक्षा जास्त देशवासियांना कोव्हिडची लस पुरवठा केला गेला. देशाच्या विकासावर दूरगामी परिणाम करणारे शेकडो धोरणात्मक निर्णय घेतले गेले. या सर्व विकासकामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी केले. (MLA Rahul Kul)
भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया टीमची बैठक आमदार कुल यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड तालुक्यातील चौफुला येथे झाली. त्यामध्ये मोदी @9 महासंपर्क अभियानाअंतर्गत दौंड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व मोर्चे, आघाड्यांची संयुक्त मोर्चा बैठक पार पडली. (MLA Rahul Kul)
यामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात मागील 9 वर्षांच्या या काळात अनेक लोककल्याणकारी योजना, महत्वपूर्ण विकासकामे झाली. कलम 370, सर्जिकल स्ट्राईक यासारखे निर्णय, कोरोना काळात 100 कोटींपेक्षा जास्त देशवासियांना कोव्हिडची लस पुरवठा केली. या सर्व विकासकामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. (MLA Rahul Kul)
दरम्यान, या बैठकीत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल, भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, दौंड विधानसभा निवडणूक प्रमुख हरिभाऊ ठोंबरे, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, भीमा पाटसचे संचालक आप्पासाहेब हंडाळ, राजेंद्र गवळी, विकास शेलार, तुकाराम ताकवणे, चंद्रकांत नातू , माजी संचालक संजय इनामके, धनजीभाई शेळके, मोहन म्हेत्रे, उमेश देवकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बापूराव भागवत, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष संदेश धायगुडे यांसह भाजपचे विविध मोर्चे, आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. (MLA Rahul Kul)