Pune weather : पुणे: अनेक दिवसांपासून पावसाच्या आगमनाकडे राज्यातील जनेतचे डोळे लागले होते. राज्यात सर्वत्र आता पावसाची रिपरिप सुरु आहे. पुणे शहरात मंगळवार हा पावसाचा दिवस ठरला. मान्सून सक्रिय असल्याने पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस होत असून, येत्या २४ तासांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, येत्या चार-पाच दिवसांमध्येही हीच स्थिती राहणार असल्याचा अंदाड भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
पुणे शहरात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
आकाशात मोठ्या आकाराचे ढग निर्माण झाले आहेत. अशीच अवस्था येत्या ३० जूनपर्यंत राहणार आहे. म्हणून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये पुणे शहरातही पावसामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे. (Pune weather ) शहरात दुपारी आकाश पूर्णतः ढगाळ राहणार असून, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, घाट माथ्यावर अतिवृष्टी होणार आहे.
मान्सून यायला उशीर केला असला तरी आता तो अतिशय वेगाने सक्रिय होऊन देशभर कोसळत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. (Pune weather )त्यामुळे मान्सून सक्रिय आहे. अरेबियन समुद्रातही हीच स्थिती आहे. त्यामुळे कोकण,नाशिक, मध्य महाराष्ट्रात अलर्ट जारी केला आहे. पुणे व घाट माथ्यावर येत्या ३० जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर तो कमी होईल. पुण्यात ३० जूनपर्यंत निरभ्र आकाश पाहायला मिळणार नाही. मध्यम स्वरूपाचा पाऊस सतत होणार आहे. असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
पुण्यातील पाऊस (मिमी)
हडपसर : ४.०
हवेली : १.०
मगरपट्टा : ०.५
लवासा : ७०.५
लोणावळा : २१.५
एनडीए १८.०
वडगावशेरी : १०.५
शिवाजीनगर : ७.५
पाषाण : ८.१
कोरेगाव पार्क : ५.०
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणेकरांनो काळजी घ्या ! सिंहगड घाटरस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका वाढला