Pune News : पुणे: कोयता गॅंगची पुण्यात दहशत कायम आहे. टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड केली जात आहे. चोरट्यांचा शहरात धुमाकुळ सुर आहे. त्यावर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत असली तरी गु्न्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. केवळ पाचशे रुपयांसाठी एकाने हातात तलवार घेवून घरात शिरुन शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरुन गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.
आरोपी अटकेत
याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. अफान शेख असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सहकारनगर भागातून एक घटना समोर आली आहे. पाचशे रुपये उसने न दिल्याने आरोपींकडून चक्क तलवारीने धाक दाखवत राडा घातल्याचे समोर आले आहे. (Pune News) फिर्यादीचे सहकारनगर परिसरात अंडा भुर्जीचे दुकान आहे. आरोपीने याच हातगाड्या वरती येऊन फिर्यादीकडे ५०० रुपयांची मागणी केली. पण फिर्यादीने पाचशे रुपये देण्यास नकार दिल्याने आरोपी थेट फिर्यादीच्या घरात घुसला. ज्यानंतर त्याने घरात घुसून घरच्यांना शिवीगाळ केली. तसेच घरासमोरच तलवार काढत धमकी देत नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात कोयता गँगची दहशत कायम ! अरण्येश्वर भागात दहशत, वाहनांची तोडफोड