Political News : पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीवर माथा टेकला, या घटनेचे पडसाद अद्याप उमटत आहेत. या घटनेबाबत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले आहे. प्रकाश आंबेडकरांच्या औरंगजेबाच्या मुद्द्यावर आमची भूमिका स्पष्टच आहे. पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडावी. (Political News)
हिंदुत्वाच्या गोष्टी करता… मग स्पष्ट करा की तुमची भूमिका काय आहे. इतर लोक गेले होते तेव्हा फडणवीसांनी फणा काढला होता. मग आता का वेटोळं घालून बसलेत. फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना म्हणावं आंबेडकरांवर बोला. राज्यकर्ते आहेत ते, त्यांनी बोललंच पाहिजे… अशा शब्दांत राऊत यांनी टीकास्त्र सोडले. (Political News)
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना ओपन चॅलेंज दिलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही कडाडून टीका केली. मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला आहे. त्यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलंय. मणिपूरविषयी पंतप्रधान कधीच बोलणार नाहीत. त्यांच्या हातून मणिपूर गेलेलं आहे. मणिपूरमध्ये त्यांना हिंदू-मुस्लिम वाद करता येत नाहीत. ते करता आलं असतं तर पंतप्रधान बोलले असते, असं संजय राऊत म्हणाले. (Political News)
शिंदेंचे सैन्य हे भाडोत्री सैन्य आहेत. बाजार बुनग्यांसोबत सरकार करत आहेत, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. देशात हुकूमशाही आहे. देशात मी म्हणजे सर्वस्व आहे. मी म्हणजे मालक आहे, हे कधीच चाललं नाही. कुणीही मालक होऊ शकत नाही, असं म्हणत संजय राऊतांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. (Political News)
दरम्यान, निवडणुका लवकर घ्या, लोकांच्या भावना समजून घ्या, असा टाहो आम्ही फोडत आहोत. मात्र, सरकार घाबरत आहे. आपण परत पराभूत होणार, हे त्यांना कळलं आहे, असं म्हणत राऊतांनी शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली. आम्ही निवडणुका घ्या असं आव्हान देत आहोत, असं म्हणत त्यांनी निवडणुकांच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. (Political News)