Patas News : पाटस : पाटस ते दौंड अष्टविनायक मार्गावर बिरोबावाडी जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
नेहल अप्पासाहेब गावडे (वय २६, रा.पाटस-बिरोबावाडी ता.दौंड जि.पुणे) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पाटस ते दौंड रस्त्यावर पाटस हद्दीत (Patas News) असलेल्या बिरोबावाडी जवळ शनिवारी (दि.२४) सकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या आसपास ही अपघाताची घटना घडली.
कार चालक किरकोळ जखमी
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, नेहल गावडे हा बिरोबावाडी येथील ग्रामदैवत श्री. बिरोबा देवाचे दर्शन घेऊन पाटस दौंड रस्त्यावरून दुचाकीवर पाटस बाजुकडे घरी जात होता. (Patas News) पाटस ते दौंड अष्टविनायक रस्त्यावरुन पाटस बाजू कडून दौंड कडे भरधाव वेगाने जात असलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक देऊन हा अपघात झाला.
या अपघातात दुचाकी चालक नेहल गावडे याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रथमदर्शनी व्यक्तींनी दिली. या अपघातात कार चालक किरकोळ जखमी झाला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आजपासून दौंड-सोलापूर नवीन डेमो सुरु…!