Pimpri News : पिंपरी-चिंचवड : भरधाव कंटेनर चालकाने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार महिला खाली पडून तिच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेले. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात मोशी –पुणे रोडवर गुरुवारी (दि.22) सकाळच्या सुमारास घडला. शहरात बेशिस्त कंटेनर चालकांमुळे अनेक अपघात होताना दिसून येत आहेत. मात्र या कंटनेर चालकांवर अद्याप ठोस कारवाई प्रशानाने केल्याचे उदाहरण नाही. मात्र सामान्यांचा यामध्ये नाहक जीव जातो आहे.
मोशी –पुणे रस्त्यावर घडला अपघात
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कंटेनगर गाडीवरील चालक व्यकट दिगंबर दिवटेवाड (वय33 रा. चिखली) याला अटक केली (Pimpri News) असून सुभाष गुलाब पावर (वय 35 रा.भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून जात होते. यावेळी एमएच14 ईएम 7878 वरील कंटेनर चालकाने त्याच्या ताब्यातील कंटेनर भरधाव वेगात चालवून फिर्यादीच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली. यात फिर्यादी यांच्या मागे बसलेली त्यांची पत्नी खाली प़डली. (Pimpri News) यावेळी त्यांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेले ज्यांत गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर फिर्यादी यांनाही डोक्याला, पाठीला व पायाला दुखापत झाली आहे व गाडीचे पुर्ण नुकसान झाले आहे. याप्रकरणी एमय़आडीसी पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : फसवणुकीचा नवा फंडा; ‘टास्क फ्रॉड’मधून महिलेला घातला तब्बल 88 लाखांचा गंडा
Pimpri News : उद्योगात भागीदारीच्या आमिषाने पती-पत्नीची तब्बल 14 लाखाची फसवणूक