Big News : मुंबई : मुंबईतून आताची मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत शिंदे-फडणवीस सरकारने कपात केली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. तसंच मातोश्रीवर असलेल्या सुरक्षारक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट गाडी तसेच पायलटही कमी केला आहे. मातोश्रीवर असलेल्या एसआरपीएफची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. झेड प्लस सुरक्षा आता व्हाय प्लस करण्यात आली आहे.(Big News)
ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत शिंदे-फडणवीस सरकारने कपात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांना नुकतीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा परिस्थितीत ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत गृह खात्याकडून अचानक कपात केल्याने खळबळ उडाली आहे. साधारणपणे ६० ते ७० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत गुंतले होते. मात्र, आता या सर्वांनाच कमी करून पुन्हा पोलीस ठाण्यांमध्ये रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.(Big News) तसंच मातोश्रीवर असलेल्या सुरक्षारक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट गाडी केली कमी केली असून पायलटही कमी करण्यात आला आहे. मातोश्रीवर असलेल्या एसआरपीएफची सुरक्षादेखील काढून टाकण्यात आली.
दरम्यान, ठाण्यातल्या लुंग्यासुंग्यांना सुरक्षा पुरवणा-या सरकारनं सुडापोटी उद्धव ठाकरेंची सुरक्षा काढल्याचा आरोप खासदार विनायक राऊतांनी केलाय. तर शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी हे सुडबुद्धीचं राजकारण असल्याचं म्हटलं आहे. शिंदे सरकारकडून ही कृती अपेक्षित असल्याचं त्यांनी म्हटलंय. एका पक्षप्रमुखाच्या सुरक्षेत कपात करुन मुख्यमंत्री स्वत:चा लौकीक कमी करत आहेत. ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक शिवसैनिक छातीचा कोट करुन सज्ज आहे, कितीही कुटनिती आणि सुडबुद्धीचं राजकारण त्यांनी केलं तरी आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय.(Big News)
दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या आरोपांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपली सुरक्षाही कमी करण्यात आली होती, म्हणजे माझं खच्चीकरण करण्यात आलं होतं का, असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. सुरक्षा समिती असते, ती आढावा घेते, यात रडण्यासारखं काय आहे, दुसऱ्यांची सुरक्षा कमी केलेली तेव्हा काही प्रश्न येत नव्हते का? असा सवाल मुनगंटीवर यांनी उपस्थित केला आहे.(Big News)