Devendra Fadnavis : पुणे : भावी पंतप्रधान… असा स्वतःबद्दल उतरांनी केलेला उल्लेख ऐकायला कोणाला आवडणार नाही? नुकत्याच पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात, आता भावी मुख्यमंत्री नको, तर भावी पंतप्रधान… असं फडणवीसांना म्हणायला हवं, असं विधान एका भाजप नेत्याने केलं. तेव्हा फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.(Devendra Fadnavis)
फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
देवेंद्र फडणवीस सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पण त्यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी अनेकांची इच्छा आहे. केंद्रातही फडणवीस चांगलं काम करू शकतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटतो. त्यामुळे आता भावी मुख्यमंत्री नको, तर भावी पंतप्रधान, असं फडणवीसांना म्हणायला हवं… या वाक्याची अनेकदा भाजप नेते, कार्यकर्त्यांकडून पुनरावृत्ती होताना दिसते.(Devendra Fadnavis)
पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेच्या नव्या इमारतीच्या शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मॉडर्न कॉलेजच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं.(Devendra Fadnavis) शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलेजमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात देवेंद्रजी आता भावी मुख्यमंत्री नको, भावी पंतप्रधान व्हा…, असं आयोजक गजानन एकबोटे म्हणाले. त्यावर मान डोलावत देवेंद्र फडणवीस यांनी नको, म्हणत हात जोडले. या प्रसंगाची पुण्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशात कोण? असा प्रश्न विचारला तर आता तुम्हीच दिसता… हे वाक्य उच्चारताच टाळ्यांचा कडकडाट होतोय. याचा अर्थ जनतेच्या मनातील भावी पंतप्रधान तुम्हीच आहात, असं एकबोटे म्हणाले. त्यावरही देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा नाही म्हणत हात जोडले. फडणवीस म्हणाले की, आम्ही नवीन शिक्षण धोरण आणलं आहे. येत्या काळात आपल्या शिक्षण पद्धतीत झपाट्याने बदल होणार आहेत. विसाव्या शतकात प्रश्न होता तो आपल्या स्वात्रंत्र्याचा, पण २१ साव्या शतकात आपल्यावर फक्त कायद्याची बंधने आहेत.(Devendra Fadnavis)
शिक्षण क्षेत्रात काळानुसार बदल करावा लागेल, असं फडणवीस म्हणाले. पुढच्या बारा वर्षांत आजच्यापेक्षा दुप्पट विद्यार्थी असतील. जग वेगाने बदलत आहे. सगळे उद्योग बदलत आहेत. वेगाने होणाऱ्या बदलांना स्विकारावं, आपलसं करावं लागेल आणि तसं मनुष्यबळ देखील आपल्याला तयार करावं लागेल, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.(Devendra Fadnavis)