राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : पुणे सोलापूर महामार्गावर यवत येथे एसटी स्टँड जवळ रस्ता ओलांडत असताना पुणे वरून सोलापूर दिशेकडे जाणाऱ्या दुचाकीची धडक लागून एकाचा जागेच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
विनाक्रमांकाच्या दुचाकीने दिली धडक
दादासाहेब सोमनाथ मदने ( वय३८ रा.दापोडी ता.दौंड जि.पुणे मुळगांव कुर्टी ता.करमाळा जि.सोलापुर) आणि प्रज्वल महेंद्र शेळके (रा.केडगाव) अशी मृ्त्यू झालेल्याचे दोघांची नावे आहेत.
दादासाहेब हा कामानिमीत्त यवत आला असता रात्री १० च्या सुमारास यवत (Yavat News ) येथील एसटी स्टँड जवळ पुणे सोलापूर महामार्ग ओलांडत असताना पुण्याच्या बाजुकडुन येणाऱ्या विना क्रमांक दुचाकीची जोरात धडक बसली.
यात धडकेत दादासाहेब मदने याला डोक्याला, तोंडाला, पायाला मार लागलेने त्याला यवत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारापूर्वीच माने याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दुचाकीवरील दोघांपैकी प्रज्वल महेंद्र शेळके (रा.केडगाव) यास ग्रामीण रुग्णालयात नेले असता पुढील उपचारासाठी लोणी येथे खाजगी हॉस्पिटलला पाठवले असता त्याचा देखील उपचारात दरम्यान मृत्यू झाला.
विवेक विकास बारवकर( रा.केडगांव) याचेवर यवत (Yavat News ) येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याबाबत सोमनाथ मदने यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मदने हे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : यवत येथील सुमतीनाथ श्वेतांबर मंदिराचा ९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Yavat News : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक कार्याध्यक्षपदी सुरज चोरगे यांची नियुक्ती
Yavat News : विठ्ठल नामाची शाळा भरली’! यवत हेरिटेज स्कूलच्या बाल- गोपाळांचा आधुनिक रिंगण सोहळा