Shirur News शिरूर : शिरूर तालुक्यातील घोडनदी कोरडी पडल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (Shirur News) जागोजागी पाण्याचे डबके असल्याने यामधील मासे पकडण्यासाठी मच्छिमार व स्थानिक नागरिकांनी घोडनदी पात्रात गर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे. (Shirur News) काही ठिकाणी विेजेचा शॅाक देऊन मासेमारी होत असल्याचे दिसून येत असून गावरान माश्यांची पैदास संपुष्टात येऊ लागली आहे. (Shirur News) यासाठी पाटबंधारे विभाग व महावितरण विभागाने कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करू लागले आहेत. (Shirur News)
मच्छिमार व स्थानिक नागरिक येथे मासे पकडून बाजारपेठेत विक्री
शिरूर तालुक्यातील घोडनदी ही साधारणतः पावसाळ्यात व डिंभा धरणाच्या पाणी व्यवस्थापनेमुळे आठ महिने वाहत असते. शिरूर तालुक्यात असणारे २२ बंधाऱ्याच्या साठवणाने या परिसराला शेतीला चांगल्या प्रकारे पाणी उपलब्ध होत असते. साधारण मे च्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील ढापे काढून टाकली जातात. त्यानंतर नदी पात्र कोरडे होते. या काळात मच्छिमार व स्थानिक नागरिक येथे मासे पकडून बाजारपेठेत विक्रीसाठी नेत असतात.
गेल्या आढवड्यापासून घोडनदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू आहे. यामध्ये चिलापी, मरळ, वाम, ही मासे मोठ्या प्रमाणात मिळून येत आहे. जुन्या काळातील मळे, शिंगटा, गुगळ,माशांची पैदास थांबलेली पहावयास मिळत आहे. त्याचे कारण म्हणजे या ठिकाणी काही मच्छिमार विजेच्या सहाय्याने मासेमारी करत आहेत. यातून या माशांची पिलावळ मृत होत चालली असल्याचे काही मच्छिमारांनी सांगितले.
नदी पात्रातले पाणी आटल्यावर महावितरण व पाटबंधारे खात्याने या ठिकाणी दक्षता घेऊन अशा विजेच्या शॅाक देऊन मच्छिमारांना आळा घालण्याचे काम करावे. पारंपारीक पद्धतीने जाळे टाकून मच्छिमार करावी. तसेच माशांची होणारी नैसर्गीक पैदास सुरू ठेवण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. असेही काहिनी सांगितले.
दरम्यान, या पुढील काळात विजेचा शॅाक देणाऱ्या मच्छिमारांवर कारवाई करण्यात येईल. असे पाटबंधारे खात्याने सांगितले.