Pimpri News : पिंपरी-चिंचवड : पती-पत्नीची तब्बल 14 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी येथे घडला आहे. टायर विक्रीच्या उद्योगात भागीदारी करणास सांगत महिन्याला 1 लाख रुपये व नफ्याच्या एक टक्का देण्याचा बहाणा करत ही फसवणूक केली आहे. हा प्रकार 5 जानेवारी 2021 ते 1 मे 2023 या कालावधीत घडला आहे.
वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
या प्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून (Pimpri News) रिझवान दिलावर मणेर (रा.थेरगाव) याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या पतीला आरोपीने मेट्रो ट्रेडर्स अन्ड टायर्स या टायर विक्रीच्या व्यवसायात पैसा गुंतवण्य़ास सांगितले. (Pimpri News) त्या बदल्यात महिन्याला 1 लाख व विक्रीच्या नफ्यावर एक टक्का परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार त्याने फिर्यादी यांच्याकडून 14 लाख 13 हजार रुपये घेतले.मात्र भागीदारी किंवा करार नाम्यानुसार आज तायागायत 1 लाख रुपये किंवा 1 टक्के नफा दिला नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.