Pune News पुणे: शुक्रवार पेठेतील चिंचेची तालीम परिसरातील एका सदनिकेत दाम्पत्य मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली होती. पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले होते. मात्र, पत्नीचा मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट नव्हते. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर या मृत्यूचे गूढ उलगडण्यास पोलिसांना यश आले आहे.
मृत पतीवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीने तिचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Pune News) या प्रकरणी मृत पतीवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनीता थोरात (वय ५८, दोघे रा. सेवा मित्र मंडळाजवळ, चिंचेची तालीम, शुक्रवार पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हेमंत रामकृष्ण थोरात (वय ६४) असे मृत पुरुषाचे नाव आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खडक पोलिस ठाण्यात मृत पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थोरात सहकारी बँकेतून निवृत्त झाले होते. त्यांनी रविवारी सकाळी मित्राला घरी बोलविले होते. दरवाजा उघडा नसल्याने त्यांना संशय आला. थोरात यांनी प्रतिसाद दिला नाही. (Pune News) त्यानंतर या घटनेची माहिती खडक पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सुनीता कॉटवर बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळून आले. हेमंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
सुनीता आणि हेमंत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Pune News)उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. सुनीता गेल्या तीन ते चार वर्षांपासून आजारी होत्या. पोलिस निरीक्षक विनय पाटणकर तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : तळजाई परिसरात पार्क केलेल्या ४० हून अधिक गाड्या गुंडांनी फोडल्या..
Pune News : ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे वाचन तरुणांनी केले पाहिजे : ह.भ.प. गणेश महाराज वाघमारे
Pune News : पुणे आरटीओकडून चारचाकी वाहनांसाठी लवकरच नवीन मालिका