युनूस तांबोळी
Shirur News शिरूर : कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उत्तम नथू जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (Shirur News) त्यांच्या या निवडीने परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. (Shirur News)
कवठे येमाई ग्रामपंचायतीचे उपसरपंच विठ्ठल मुंजाळ यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती. सोमवार ( ता. १९ ) सरपंच सुनिता पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली या पदाची निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी उत्तम जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीचे कामकाज चेतन वाव्हळ यांनी पाहिले.
दरम्यान, उत्तम जाधव यांची उपसरपंचपदी निवड होताच, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष पोकळे, अरूणा घोडे, सरपंच सुनिता पोकळे यांनी अभिनंदन केले आहे.
गावातील जेष्ठांच्या आरोग्य विषयक समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दर्जात्मक शिक्षणावर भर देण्यात येईल. पाणी,विज, रस्ते या संदर्भात प्रशासकिय पातळीवर पाठपुरावा केला जाईल. असे नवनिर्वाचित उपसरपंच जाधव यांनी सांगितले.