राजेंद्रकुमार शेळके
Pune News : पुणे : सध्याच्या काळात आपल्या देशातील तरुण पिढीत पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याची चढाओढ लागली आहे. त्यांचे अनुकरण करताना आपल्या पिढीस आपली संस्कृती, सण, उत्सव, रितीरिवाज यांचा विसर पडला आहे. पाश्चिमात्य जीवनशैली जगण्याच्या नादात स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करून व्यसनाधीन होत चालली असल्याचे चित्र सर्वदूर पाहावयास मिळत आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी व स्वधर्म रक्षणासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या पवित्र व पावन ग्रंथ ज्ञानेश्वरीची एक ओवी अनुभवून तिचा जीवनात अनुभव घेऊन त्यानुसार जीवन व्यतित करावे, असे प्रतिपादन ह.भ.प. गणेश महाराज वाघमारे यांनी केले.
ओझर येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे कै. बाबुराव घोलप आदर्श सेवक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त ग्रंथपाल सुदाम घेगडे यांच्या 71 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, जोपर्यंत माणूस हयात आहे. तोपर्यंत त्याची सेवा करा. वाढदिवसाला केक कापला जातो व तो खाल्ला जातो. तो केक बनवताना त्यात वापरले जाणारे इष्ट हे आरोग्यास हानिकारक असते. (Pune News) त्यामुळे आपण पैसे देऊन आजार विकत घेत आहोत. केकच्या ऐवजी गाईच्या दुधापासून तयार केलेले पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
यावेळी मराठा सेवा संघाचे अरविंद वळसे पाटील, शिवसेनेचे (ठाकरे गट) जुन्नर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर खंडागळे, विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, (Pune News) माजी अध्यक्ष शाकुजी कवडे, बी. व्ही. मांडे, वसंतराव कवडे, डॉ. प्रमोद पारखे, ग्रामविकास ट्रस्ट अध्यक्ष संतोष मांडे, महेश कवडे, हभप तुकाराम महाराज दुराफे, हभप अरुण महाराज कुलवडे, हभप गणेश महाराज शिंदे, महात्मा जोतीबा फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दत्ता शिंदे, आर्या ग्रुपचे वसंतराव कवडे, बाळासाहेब महाले, विनायक मानसुख, विविध शिक्षण संस्थांतील प्राध्यापक व ओझर परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र बोऱ्हाडे, सूत्रसंचालन कैलास मांडे यांनी तर आभार कैलास घेगडे यांनी मानले.
ज्ञानेश्वरी ग्रंथ ‘लाईफ मॅनेजमेंट’चे पुस्तक ठरू शकते
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ एका तरुणाने लिहिला असून, याचे वाचन तरुणांनीच केले पाहिजे. आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या कालखंडात आपल्या आयुष्यात कठीण काळ येतो, तेव्हा आपल्याला शक्ती व ऊर्जा देणारे उत्तम तत्वज्ञान म्हणजेच ज्ञानेश्वरी. हा ग्रंथ लाईफ मॅनेजमेंटचे पुस्तक ठरू शकते याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. (Pune News) या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या आयुष्यात अमुलाग्रह बदल घडू शकतो, म्हणूनच मुलगा विनोद घेगडे (उद्योजक) यांनी वडिलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रायोगिक तत्त्वावर आम्ही समाजातील 71 तरुणांना संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देत आहोत. वडिलांच्या 71 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून तसेच विद्यालयाची गरज जाणून घेऊन श्री विघ्नहर विद्यालय ओझरचा माजी विद्यार्थी म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून, दोन कॉम्प्युटर मशीन शाळेला सुपूर्द करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक साबळे एस. बी., गणेश राऊत, संतोष सगर, जाधव आर. एस., शेवाळे पी. जी. आणि अल्फाबेट कॉम्प्युटरचे अल्पेश बोडके आणि दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : विठ्ठल गायकवाड यांना रमाईपुत्र पुरस्कार प्रदान
Pune News : पुणे आरटीओकडून चारचाकी वाहनांसाठी लवकरच नवीन मालिका