Pune News : पुणे : पुणे शहरात शनिवार (दि.17) रोजी वारजे परिसरात भरदिवसा गोळीबार झाला होता. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. या गोळीबारात एक 21 वर्षीय तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी तीन जणांना अवघ्या २४ तासात पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.
दोन गावठी पिस्तुले जप्त
सुरज तात्याबा लंगार (21, रा. वारजे माळवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी परिसरातील जय भवानी चौक पाण्याच्या टाकीजवळुन सुरज जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याच्यावर गोळीबार केला.(Pune News) एकुण 3 राऊंड फायर केले असल्याची माहिती वारजे माळवाडी पोलिसांनी दिली आहे. गोळी सुरजला डाव्या बाजूला चाटून गेली असून तो जखमी झाला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना रविवारी वारजे माळवडी पोलीसांना गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांबद्दल माहिती मिळाली.
गोळीबार करणारे तिघे वारजे येथून लाल-काळया रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून तोंडाला रूमाल बांधून चांदणी चौकाच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. (Pune News) त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून तीन जणांना ताब्यत घेतले. त्यांच्याकडे असलेले दोन देशी बनावटीची गावठी पिस्तूल पोलीसांनी जप्त केले आहेत. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या २४ तासात पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. तीनही आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सैन्यदलामध्ये असल्याचे भासवून फसवणूक; एक ताब्यात; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी!