Pune News : पुणे : भारतीय सैन्य दलामध्ये असल्याचे भासवून, सैन्य दलाचे सुभेदार पदाचे दोन गणवेश व इतर साहित्य खरेदी केले. गणवेश परिधान करुन अधिकारी असल्याचे दाखवून बनावट आधारकार्ड तसेच पॅनकार्ड काढले. ओळखपत्रावर भारतीय सैन्य दलाचा गणवेश परिधान केलेल्या फोटोचा वापर करून फसवणूक केली. याप्रकरणी एकाला खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रशांत भाऊराव पाटील (वय ३२, धंदा- सिक्युरिटी गार्ड, सध्या रा. म्हेत्रे निवास, दुर्गानगर, सोनवणेवस्ती, चिखली, पुणे, मूळ रा. मु. पो. कुपटगिरी, ता. खानापूर, जि. बेळगाव, राज्य- कर्नाटक) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Pune News) याप्रकरणी खंडणी विरोधी पथक पुणे शहर शाखेचे पोलीस अंमलदार अमोल परशुराम पिलाणे यांनी तक्रार दिली आहे.
नगर येथेही करण्यात आली होती अटक
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅट्रीमोनीयल साईटवर स्वतः सैन्य दलातील अधिकारी असल्याची माहिती देऊन नाशिक येथील एका महिलेशी संपर्क साधला. सैन्यदलाचा गणवेश असलेला स्वतःचा फोटो पाठविला, अशी माहिती मिलिटरी इंटेलिजन्स सदन कमांड, पुणे यांना मिळाली होती. संशयित व्यक्तीबाबत माहिती घेतली असता, संबंधित व्यक्तीचे नाव प्रशांत पाटील असे असून, तो सन २०१९ मध्ये भारतीय सैन्य दलाचे पॅरा मिलिटरी फोर्स आसाम रायफलमधून नोकरी सोडून पळून आल्याची माहिती मिळाली होती.
संबंधित व्यक्ती सैन्य दलाचा गणवेश असलेला फोटो व सैन्य दलाच्या ऑफिसचा पत्ता असलेले आधारकार्ड वापरुन समाजामध्ये सैन्यदलामध्ये नोकरी करीत असल्याचे भासवत होती. (Pune News) त्याच्या आधारकार्डमधील माहिती बनावट आहे. तसेच या व्यक्तीला नगर येथे बनावटीकरण गुन्हयामध्ये तसेच एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या गुन्हयामध्ये अटक करण्यात आल्याची माहिती मिलिटरी इंटेलिजन्स सदन कमांड टीम, पुणे यांनी दिली.
प्रशांत पाटीलकडे अधिक चौकशी केली असता, त्याने २०१९ पासून ते आजपर्यंत भारतीय सैन्य दलामध्ये असल्याचे भासवून, खडकी येथील (Pune News) दुकानदार सेवानिवृत्त सुभेदार मेजर सुरेश मोरे यांच्याकडून सैन्य दलाचे सुभेदार पदाचे दोन गणवेश व इतर साहित्य असे ४ हजार ७०० रुपयांचे साहित्य खरेदी करुन, पैसे नंतर देतो असे सांगून अद्यापपर्यंत पैसे न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली.
तसेच त्याने सदन कमांडमध्ये कार्यरत असल्याचे भासवून, सैन्य दलाचा गणवेश परिधान करुन व सैन्य दलाचा गणवेश असलेले फोटो, बनावट आय.डी. वापरुन सदनकमांड हेडक्वॉटर क्वीन्स गार्डन, पुणे या सैन्य दलाचे प्रमुख कार्यालयाचे परिसरात (Pune News) तो अधिकारी असल्याचे दाखवून, तसेच तो राहात नसलेल्या सदन कमांड, पुणे या कार्यालयाच्या पत्त्याचा वापर करुन बनावट आधारकार्ड काढून तसेच पॅनकार्ड व ओळखपत्रावर भारतीय सैन्य दलाचा गणवेश परिधान केलेल्या फोटोचा वापर करून फसवणूक केल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : खळबळजनक! पुण्यातील वारजे कॅनाॅल रस्त्यावर 5 गाड्यांच्या काचा फोडल्या; नागरिक संतापले