दीपक खिलारे
Indapur News, इंदापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचविण्याचे काम प्रभावीपणे करावे. (Indapur News) पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्वाखाली देशाने 9 वर्षामध्ये सर्व क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे. (Indapur News) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशामध्ये व जगात लोकप्रियता वाढत आहे, असे गौरोदगार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (ता.१८) काढले. (Indapur News)
निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे आलिशान पॅलेस मंगल कार्यालयात इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रमाचे व मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियाना अंतर्गत टिफिन बैठकीचे हर्षवर्धन पाटील यांचे उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.
प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख व भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत मोठ्या स्क्रीन वरती पाहिला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन ऐकले .
भाजप कार्यकर्त्यांच्या टिफिन बैठकीत हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारने जात, धर्म, पंथ न पाहता जनतेच्या विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे.पी. नड्डा जी यांनी 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दि.31 मे ते 30 जून या कालावधीत देशभर महासंपर्क अभियान सुरू केला आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये देण्यात येत आहे. देशामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 3 कोटीहून अधिक गरिबांना घरी देण्यात आली आहेत. आयुष्यमान भारत योजनेसाठी गोल्डन कार्ड नागरिकांना देण्यात येत आहे. देशातील 55 कोटी जनतेला या योजनेचा लाभ होत आहे. इंदापूर तालुक्यातील आपण ही योजना राबविण्यासाठी शिबिरे घेतली.
ते पुढे म्हणाले, चालु असलेल्या सन 2023 या वर्षात देशातील 81 कोटी जनतेला पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत वर्षभर मोफत धान्य दिले जात आहे. पुणे जिल्ह्यातील संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग निर्माण केले. त्याचा फायदा पुणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात झाला आहे. केंद्र सरकारकडून ‘ हर घर हर जल ‘ योजना राबविली जात आहे. त्याचा लाभ पुणे जिल्ह्यातील प्रनरेंद्रला मिळत आहे.
भारत हा विकसनशील देश असून, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्वाखाली भारत हा विकसित देश म्हणून जगात उदयास येत आहे. जगातील पहिल्या चांगल्या मजबूत 5 अर्थव्यवस्थांमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेची गणना होत आहे. सन 2019 ला भाजपने 303 जागा जिंकल्या. सन 2024 ला भाजपचे 350 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे, तर एनडीए एकूण 400 जागा मिळतील, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी नमूद केले.
तसेच राज्यातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्वाखाली चांगले काम करीत असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
प्रास्ताविक भाजपचे तालुकाध्यक्ष अँड शरद जामदार यांनी केले. यावेळी मारुती वनवे, बाबा महाराज खारतोडे, देवेंद्र पालिवाल यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर निलाखे यांनी केले. कार्यक्रमास भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.