Weather Forcast : पुणे : मान्सूनच्या आगमनाकडे राज्यातील शेतकर्ऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत. मात्र मान्सून मात्र, पश्चिम बंगाल व बिहारमध्ये प्रगती करीत असून महाराष्ट्राला प्रतीक्षाच असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. आगामी पाच दिवस देशाच्या बहुतांश भागांत उष्णतेची लाट राहणार आहे. मान्सूनने पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारली असून, दक्षिण भारतातील काही भागांत तो पुढे जात आहे. महाराष्ट्रात मान्सूनला अजूनही अनुकूल स्थिती मिळाली नसल्याने तो रत्नागिरीतच आहे. उर्वरित देशात मात्र अजूनही कडक उन्हाळाच सुरू आहे. आगामी पाच दिवस देशाच्या बहुतांश भागांत उष्णतेची लाट राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानात पूर्ण शमले. मात्र, तेथे जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गुजरात, राजस्थान वगळता अन्यत्र मोठा पाऊस नाही.
विदर्भात अजूनही पारा 40 ते 42 अंशांवर असून, गडचिरोली (42.3), चंद्रपूर (42.6), वाशिम (41) गोंदिया (40)
ही शहरे उन्हाळ्यासारखीच तापली आहेत. (Weather Forcast) अजून आठवडाभर ही लाट कायम राहील, असा अंदाज आहे. देशातील ओडिशा, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा या भागांत उष्णतेची लाट तीव्र आली आहे.
सुती कपडे घाला, भरपूर पाणी प्या
हवामान विभागाने सावधानतेचा इशारा देत, उन्हापासून बचाव करण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत. यात जेथे उष्णतेची लाट तीव्र आहे तेथील नागरिकांनी बाहेर पडताना सुती कपडे घाला, भरपूर पाणी, सरबत प्या. (Weather Forcast) तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना दुपारी 1 ते 4 या वेळेत विनाकारण बाहेर नेऊ नका, असा सल्ला दिला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Weather Update : मान्सूनच्या वाटेतील काटे दूर ; मुंबई, पुण्याकडे प्रवास…
Weather Forecast : प्रतीक्षा संपली, मान्सून केरळमध्ये दाखल; भारतीय हवामान विभागाची माहिती
Weather News : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ; १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान…!