Ganesh Dhore : हडपसर, (पुणे) : प्रभागात केलेल्या कामाची तक्रार केल्याच्या रागातून जातीवाचक शिवीगाळ केल्यापक्ररणी पुण्यातील एका माजी नगरसेवका विरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ganesh Dhore)
गणेश बाळासाहेब ढोरे (वय – ३५, रा. फुरसुंगी रस्ता, भेकराईनगर, हडपसर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. तर सागर पोट्रे (वय- २६ रा. पापडे वस्ती, फुरसुंगी) आणि प्रणव ढमाले (वय – २६, रा. भेकराईनगर) यांच्याविरूध्द मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ganesh Dhore)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश ढोरे हे फुरसुंगी परिसरातील माजी नगरसेवक आहेत. त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कारभाराबाबत कोणीतरी पत्रकाराने तक्रार केली होती. त्यानंतर ढोरे यांनी फिर्यादीच्या घरी जाऊन त्यास जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर फिर्यादीने पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला होता. त्याचा राग मनात ठेवुन गणेश ढोरे यांनी पोट्रे आणि ढमाले यांना सांगुन तक्रारदारास मारहाण केली होती. (Ganesh Dhore)
दरम्यान, सदरील गुन्हा हा कोंढवा पोलिस ठाण्यातून हडपसर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत. (Ganesh Dhore)