Big Breaking News पिंपरी : पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारितील निगडी पोलिस चौकीत कार्यरत असणार्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस अंमलदार आणि एका खाजगी मध्यस्थाला लाच घेताना ताब्यात घेतले आहे. (Big Breaking News) दीड लाख रुपयांचे हे लाच प्रकरण असल्याची माहिती समोर येत आहे. (Big Breaking News)
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. निगडी पोलिस ठाण्याच्या अंकित असलेल्या निगडी पोलिस चौकीच्या अधिकार्यावर हा ट्रॅप झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. खुद्द पोलिस आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी लाच प्रकरणात अडकल्याने शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे
तीन जण ताब्यात
या लाचप्रकरणी केलेल्या सापळा कारवाईत एकूण तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.