Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : रमाई आवास योजनेखालील सन 2021-22 व 2022-23 पर्यंतच्या घरकुलांना मंजुरी मिळावी. तसेच अनुसूचित जाती जमाती व नवबौध्द वर्गातील बेघर आर्थिक दुर्बल लोकांसाठी महाराष्ट्रात रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत घरे बांधण्यासाठी निधी द्यावा, या मागण्यांचे निवेदन लहुजी शक्ती सेनेच्या वतीने हवेलीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी यांच्यामार्फत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले. (Loni Kalbhor News)
आर्थिक दुर्बल घटकांचे स्वतःचे घर बांधून अनुसूचित जाती जमाती व नवबौध्द वर्गातील लोक प्रगतीच्या दिशेने येण्यासाठी ही योजना शासनाकडून आर्थिक अनुदान देऊन राबवली जाते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून शासन स्तरावर हजारो प्रस्ताव मंजुरीविना प्रलंबित आहेत. तरी आपण याचा विचार करून रमाई आवास योजनेतील घरकुलांना मंजूरी द्यावी, असे निवेदन देण्यात आले आहे. (Loni Kalbhor News)
दरम्यान, संबंधित विभागाला आदेश देऊन लाभापासून कोणी वंचित राहू नये, याची खबरदारी घेण्याची विनंती लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट, पुणे जिल्हा सरचिटणीस आकाश मात्रे, हवेली तालुका उपाध्यक्ष पोपट पाटोळे, अशोक मात्रे यांनी निवेदनाद्वारे केली. (Loni Kalbhor New)