दीपक खिलारे
Farmers meeting : इंदापूर, (पुणे) : रयत क्रांती संघटनेच्या वतीने रविवारी (ता. १८) वरकुटे बु. (ता. इंदापूर) येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष निलेश देवकर म्हणाले, सन २०२२ – २३ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाचे बील मिळावे, दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट काढावी, शेती तुकडेबंदी कायदा रद्द करावा, गाईच्या दुधाला ४० रुपये, म्हशीच्या दुधाला ७० रुपये प्रतिलिटर भाव मिळावा, शेतकऱ्यांची शेतीची संपूर्ण वीजबिल माफ करावी, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मोफत मिळावे, पाणीपट्टी रद्द करावी, शेतकऱ्यांच्या गाई, म्हशी व इतर पशुधनाचे एक रुपया मध्ये विमा योजना सुरु करावी
शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कोणतीही कर्जमाफी मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागण्यासाठी सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Farmers meeting) तरी या मेळाव्यास शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
या शेतकरी मेळाव्यास रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. या मेळाव्यास रयत क्रांती पक्ष अध्यक्ष भानुदास शिंदे, कार्याध्यक्ष दिपक भोसले, राज्य प्रवक्ते प्रा. सुहास पाटील, राज्य प्रवक्त्या अनिता ताकवणे, पुणे जिल्हाध्यक्ष महेश गलांडे, महिलाध्यक्षा दिपाली म्हेत्रे, (Farmers meeting) सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष वरगड, दौंड तालुकाध्यक्ष सरफराज शेख, इंदापूर तालुकाध्यक्ष अभिमन्यू शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहितीहि यावेळी निलेश देवकर यांनी दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Farmer News : चिया कडधान्यातून शेतकरी मालामाल ; महाराष्ट्रातील पहिलेच पीक…!
Farmer News : जिल्ह्यातील ३६६ शेतकऱ्यांचे ४९ कोटींचे प्रस्ताव मंजूर…!