Pimpri News पिंपरी : कंपनीत काम करणाऱ्या हेल्पर महिलेवर सुपरवायझरने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार हिंजवडी फेज २ येथील एका कंपनीत २६ मे रोजी घडला.
पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी फेज २ मधील घटना
याप्रकरणी पीडित महिलेने मंगळवारी (ता. १३) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. (Pimpri News) त्यानुसार, सूर्यकांत गणपती रामनल्ली (वय ३४, रा. हिंजवडी) याला पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही कंपनीत हेल्पर म्हणून काम करते, (Pimpri News) तर आरोपी हा कंपनीत सुपरवायझर आहे. त्याने २६ मे रोजी पीडितेवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केला. तसेच आरोपीने पीडित महिलेला धमकीही दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : भोसरीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या